टाकळीरोड परिसरातून सायकलींची चोरी
By Admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:04+5:302017-03-23T17:18:04+5:30
नाशिक : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या सायकली चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना टाकळीरोड परिसरात घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय ॲनेक्स सोसायटीच्या पार्किंगमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हवासिंग हनुमाना व निसाकर राऊत यांच्या दोन हजार रुपये किमतीच्या दोन सायकली लावलेल्या होत्या़ या दोन्ही सायकल चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़
र म शिंदे : कर्जत येथे विजयी सभाकर्जत : पंचायत समितीप्रमाणेच जिल्हा परिषदेतही भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास राज्याचे जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे बोलताना व्यक्त केला. कर्जत तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीनंतर कर्जत येथे पंचायत समिती सभागृहात भाजप व शिवसेना यांची विजयी सभा झाली. यावेळी नूतन सभापती व उपसभापती यांचा राम शिंदे यांनी सत्कार केला. कर्जत नगर पंचायत, कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व आता जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे आपली सत्ता आली आहे. यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. हा विजय मतदार, कार्यकर्ते संघटनेचा आहे. हे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी बांधील आहे. जनाधार मिळाला आहे. तो नम्रपणे स्वीकारला आहे. यापुढेही केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य माणसाला मिळाल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. निवडणूक काळात काही गोष्टी अशा घडल्या आहेत त्यामुळे मला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. यापुढे निवडणुकीत हेवेदावे बाजूला ठेवून विकासकामाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, शांतीलाल कोपनर, धनराज कोपनर यांचीही भाषणे झाली. पणन मंडळाचे संचालक प्रसाद ढोकरीकर, भारत मासाळ, डॉ. कांचन खेत्रे, विजय तोरडमल, रवींद्र दामोधरे, काका धांडे. तसेच सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)