बायडेन यांची घोषणा चीन-पाकिस्तानला धक्का! भारतासोबतचा इकॉनॉमिक कॉरिडॉर गेम चेंजर ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 10:44 PM2023-09-09T22:44:17+5:302023-09-09T22:45:52+5:30
G20 शिखर परिषदेत पहिली मोठी घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारत मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरची घोषणा केली आहे.
G20 शिखर परिषदेत पहिली मोठी घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारत मध्य पूर्व युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरची घोषणा केली आहे. भारत, UAE, सौदी अरेबिया, EU, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांच्यातील संपर्क वाढवण्यासाठी हे काम सुरू आहे. या घोषणेमुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सतत वाढत असलेल्या मैत्रीला मोठा धक्का म्हणूनही मानले जात आहे.
भारत आणि मध्य पूर्व यांच्यातील व्यापार वाढवण्यावर बराच काळ भर दिला जात आहे. पण तो मार्ग ना पाकिस्तानमधून जाऊ शकतो ना चीनची मदत घेतली जाऊ शकते. मध्यपूर्वेत व्यापार सहज पसरवता येईल असे नेटवर्क कसे तयार करायचे हे सर्वात मोठे आव्हान होते. याच दिशेने या वर्षी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अमेरिकेत महत्त्वपूर्ण बैठक झाली. ती बैठक या नव्या प्रकल्पाचा पाया बनला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश भागाला थेट फायदा होणार आहे. या योजनेत डेटा, रेल्वे, वीज आणि हायड्रोजन पाइपलाइनचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे भारत आणि युरोपमधील व्यापार ४० टक्क्यांनी वाढेल. अनेक वर्षांपासून विकास प्रकल्पांच्या मार्गात अडथळे बनून उभ्या असलेल्या अनेक कल्पनांना आता हा प्रकल्प मोडीत काढण्याचे काम करणार आहे.