मोठी दुर्घटना टळली! दिल्ली विमानतळावर विमान विजेच्या खांबाला धडकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:32 IST2022-03-28T17:12:47+5:302022-03-28T17:32:09+5:30
SpiceJet flight collides with electric pole : स्पाईसजेट कंपनीचे विमान जे दिल्लीहून जम्मूसाठी उड्डाण करणार होते. विमानतळावरच एका विजेच्या खांबाला धडकलं आहे.

मोठी दुर्घटना टळली! दिल्ली विमानतळावर विमान विजेच्या खांबाला धडकलं
दिल्लीविमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे विमान विजेच्या खांबाला धडकलं आहे. विमान मागे घेत असताना हे विमान खांबाला धडकले आहे. यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. स्पाईसजेट कंपनीचे विमान जे दिल्लीहून जम्मूसाठी उड्डाण करणार होते. विमानतळावरच एका विजेच्या खांबाला धडकलं आहे. विमानाच्या उजव्या पंखाला विजेच्या खांबाला धडकल्याने मोठं नुकसान झालं आहे. बोइंग 737-800 हे अपघातग्रस्त विमान होतं.
विमान रनवेवर घेत असताना विमान अपघात घडला. सुदैवाने विमानात प्रवासी नव्हते. या घटनेत विमानाच्या पंखांचे नुकसान झालं आहे. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली असून या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे एअरपोर्ट ऑथोरिटींनी सांगितले.