Arunachal Pradesh Avalanche: अरुणाचलमध्ये मोठी दुर्घटना! हिमस्खलनामध्ये सात जवान बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 17:20 IST2022-02-07T17:20:13+5:302022-02-07T17:20:34+5:30
सुत्रांनी सांगितले की, जवानांचा शोध सुरु आहे. त्यांना वाचविण्यासाठी विशेषज्ञांची टीमला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.

Arunachal Pradesh Avalanche: अरुणाचलमध्ये मोठी दुर्घटना! हिमस्खलनामध्ये सात जवान बेपत्ता
अरुणाचलमध्ये मोठी हिमस्खलनाची घटना घडली आहे. यामध्ये सात जवान बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिल्लीमध्ये सांगितले की, या बेपत्ता जवानांचा शोध आणि मदतकार्य सुरु आहे. हिमस्खलनाची ही घटना कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगामध्ये घडली आहे. रविवारी जवानांचे गस्ती पथक या भागात गस्तीसाठी निघाले होते. तेव्हाच हिमस्खलन झाल्याने हे जवान त्यामध्ये अडकले आहेत.
सुत्रांनी सांगितले की, जवानांचा शोध सुरु आहे. त्यांना वाचविण्यासाठी विशेषज्ञांची टीमला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून तिथे सतत बर्फवृष्टी होत आहे. यामुळे बचावकार्यातही अडथळे येत आहेत.