जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 06:20 PM2024-09-20T18:20:53+5:302024-09-20T18:26:45+5:30

BSF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला.

Big accident in Jammu and Kashmir! A bus full of BSF personnel fell into a deep ditch | जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

BSF Bus Accident News : जम्मू-काश्मीरच्या बडगाव येथे BSF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. बस खोल खड्ड्यात कोसळल्याने ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी हजेरी लावली. अनेक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. मदत आणि बचाव पथक जखमींना बाहेर काढण्यात आणि रुग्णालयात नेण्यात व्यग्र आहे. स्थानिक लोकांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

माहितीनुसार, काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील वाटरहाळे भागात बीएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. बस कोसळल्याचे समजताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. पाच बसचा ताफा रस्त्यावरून जात होता. पण, शेवटची बस नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे ती सुमारे ४० फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात दोन डझनहून अधिक जखमी झाले असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: Big accident in Jammu and Kashmir! A bus full of BSF personnel fell into a deep ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.