केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 16:33 IST2021-10-06T16:24:36+5:302021-10-06T16:33:25+5:30

11.56 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 78 दिवसांचा बोनस जाहीर

Big announcement for textile industry, Rs 4445 crore announcement from Center for 'Mitra' scheme | केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद

केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली: आज मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर दिली आहे. या योजनेअंतर्गत देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क उभारण्यात येतील. टेक्सटाईल मेगा पार्कसाठी सुमारे 4500 कोटी रुपये खर्च केले जातील. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अनुराग सिंह ठाकूर यांनी आजच्या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वस्त्रोद्योगासाठी 'पीएम मित्र' योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी देशभरात 7 मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. यासाठी 4445 कोटी खर्च केले जाणार आहेत. यामुळे कापड आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होईल. पियुष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योगात निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने सात मोठे निर्णय घेतले आहेत. यापैकी सहा निर्णय आधीच घेतले गेले आहेत. आज या उद्योगासाठी सातवा निर्णय घेण्यात आला.

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे.

अनुराग ठाकूर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आले. अनेक वर्षापासून प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना मिळतो. पण, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, यावर्षी रेल्वेच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाणार आहे.
 

Web Title: Big announcement for textile industry, Rs 4445 crore announcement from Center for 'Mitra' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.