उज्ज्वला योजनेबाबत केंद्राकडून मोठी घोषणा...! वाचा काय आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 08:55 PM2018-12-17T20:55:27+5:302018-12-17T20:56:42+5:30

पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे आतापर्यंत 5.86 लाख लाभार्थ्यांना कमी पैशांत गॅस जोडणी देण्यात आली आहे.

Big announcement from Ujjawala Yojana ...! Read what it is ... | उज्ज्वला योजनेबाबत केंद्राकडून मोठी घोषणा...! वाचा काय आहे...

उज्ज्वला योजनेबाबत केंद्राकडून मोठी घोषणा...! वाचा काय आहे...

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे आतापर्यंत 5.86 लाख लाभार्थ्यांना कमी पैशांत गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेच्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना सर्वांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब कुटुंबांनाही घरगुती गॅस जोडणी घेता येणार असून त्यासाठी अॅपिडेव्हिट करावे लागणार आहे. यामुळे 100 टक्के घरांपर्यंत एलपीजी पोहोचू सकणार आहे.




केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या योजनेची माहिती मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली. याचबरोबर बिहारमधील पटना शहरात गंगा नदीला समांतर चार लेनचे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 2936.42 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी दिली. तसेच हे पूल 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगितले. 




या शिवाय केंद्र सरकारने तामिळनाडूमधील मदुराई आणि तेलंगानामध्ये दोन एम्स उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी अनुक्रमे 1264 आणि 1028 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. 




 

Web Title: Big announcement from Ujjawala Yojana ...! Read what it is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.