बीग बी, माधुरीला ‘नूडल्स’ भोवणार

By admin | Published: May 31, 2015 02:09 AM2015-05-31T02:09:08+5:302015-05-31T02:09:08+5:30

बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.

Big bee, 'noodles' in Madhuri | बीग बी, माधुरीला ‘नूडल्स’ भोवणार

बीग बी, माधुरीला ‘नूडल्स’ भोवणार

Next

बाराबंकी : नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वे आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. बाराबंकीचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.के. पांडेय यांनी सांगितले की, विभागाच्या वतीने वरिष्ठ मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात नेस्ले इंडिया लिमिटेडची हिमाचल प्रदेश शाखा, दिल्लीच्या कनॉट सर्कल येथील नोंदणीकृत कार्यालय, ईझी-डे बाराबंकी, ईझी-डे दिल्ली, ईझी डेचे व्यवस्थापक मोहन गुप्ता आणि शबाब आलम यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Big bee, 'noodles' in Madhuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.