‘बिग बेन’चा घंटानाद १५७ वर्षांनंतर होणार शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:03 AM2017-08-15T01:03:44+5:302017-08-15T01:03:48+5:30
गेली १५७ वर्षे न चुकता दर तासाला टोल देणारे लंडनचे जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ घड्याळ येत्या २१ आॅगस्टपासून चार वर्षे ‘शांत’ होणार.
लंडन : गेली १५७ वर्षे न चुकता दर तासाला टोल देणारे लंडनचे जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ घड्याळ येत्या २१ आॅगस्टपासून चार वर्षे ‘शांत’ होणार. हे घड्याळ वेस्टमिंस्टर राजप्रासादाच्या एलिझाबेथ मनोºयात आहे. या मनोºयाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ‘बिग बेन’चे टोले बंद ठेवण्यात येणार आहेत; मात्र घड्याळ्याच्या तबकडीवर अचूक वेळ दिसत राहील.
या कामासाठी २९ मिलियन पाऊंडचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३१ मे १८५९ नंतर हे घड्याळ अविरत सेवा देत आहे. १३.७ टन वजनाची ही घंटा अनेकांसाठी आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. २००७ मध्ये येथे दुरुस्ती झाली तेव्हा काही काळासाठी ही घंटा शांत झाली होती. दोन्ही विश्वयुद्धांच्या काळातही ही घंटा बंद होती. या टॉवरची दुरुस्ती करणाºया कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ही घंटा बंद करण्यात येणार आहे. या यंत्रणेतील चिमणी गुरुत्वाकर्षणावर आधारित आहे. त्यामुळे घंटीला मारण्यात येणारा हातोडा बंद करावा लागणार आहे. या मशीनपासून ही घंटा बाजूला केली जाणार आहे. अर्थात, हे काम वेस्टमिंस्टर पॅलेसच्या व्यापक पुनर्निर्माणाचा भाग नाही. हाऊस आॅफ कॉमन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, गोपनीयतेच्या कारणास्तव या योजनेचा एकूण खर्च आणि इतर माहिती आम्ही देऊ शकत नाही.