सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा, पगारात होणार घसघशीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:19 AM2021-03-17T09:19:48+5:302021-03-17T09:21:00+5:30
सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे. नियमानुसार बेसिक पगाराला अनुसरुन पीएफ आणि ग्रॅज्युएटी कट होते.
नवी दिल्ली - देशातील लक्षावधी सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात चांगलाच फायदा होणार आहे. महागाई भत्त्यासह या सर्वच कर्मचाऱ्यांच्या पगारातही भरमसाठ वाढ होणार आहे. कोरोना महामारीमुळे जानेवारी ते जुलै 2020 आणि जुलै ते डिसेंबरपर्यंत त्यांना 7 टक्के महाभाई भत्त्यात देण्यात आला नाही. मात्र, आता जानेवारी ते जुलैपर्यंतच्या महागाई भत्ता जाहीर होणार आहे. साधारपणे 4 टक्के महागाई भत्ता असणार आहे.
सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे. नियमानुसार बेसिक पगाराला अनुसरुन पीएफ आणि ग्रॅज्युएटी कट होते. तसेच, नवीन पगार कोडनुसार सीटीसीमध्ये मूळ पगार 50 टक्क्यापेक्षा कमी नसली पाहिजे. डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढणार असल्यानं सर्वच पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. डीएमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, पेन्शनर्संना 10 हजारऐवजी 16 हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन कामगार कायदा लागू होऊ शकतो. केंद्र सरकारकडून 1 एप्रिलपासून नवीन कामगार कायद्याच्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू होऊ शकते.
नवीन कामगार कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फरक पडणार आहे. सद्यस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. जुलै 2019 पासून याच दराने डीए मिळत आहे. जानेवारी 2020 मध्ये नवीन डीए लागू करण्यात येणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे जुलै 2020 आणि जानेवारी 2021 पर्यंतचा डीए रद्द करण्यात आला. आता, वाढीव महागाई भत्त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 21 टक्क्यंपर्यंत डीए मिळणार आहे. गेल्याच वर्षी केंद्र सरकारने महाभाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे, आता 1 जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडू व्यक्त होत आहे.