गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 01:49 PM2020-12-29T13:49:42+5:302020-12-29T13:52:02+5:30

Mansukh Vasava resigns : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Big blow to BJP in Gujarat, BJP Bharuch MP Mansukh Vasava resigns from the party | गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Next
ठळक मुद्दे मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात मनसुख वसावा हे गुजरातमधील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आदिवासी समुदायामध्ये त्यांचा मोठा जनाधार आहेमनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येभाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातभाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी स्पष्ट केले आहे.

भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी २८ डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.



या पत्रात मनसुख वसावा यांनी लिहिले की, मी पक्षासोबत निष्ठेने राहिलो आहे. तसे पक्ष आणि जीवनातील सिद्धांताचे पालन करण्यामध्ये खबरदारी बाळगली आहे. मात्र शेवटी मी एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे.

मनसुख वसावा हे हल्लीच्या काही विधानांमुळे चर्चेत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पत्र लिहून वसावा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत आहे. याशिवाय स्टॅच्यु ऑफ युनिटीसंदर्भात वसावा यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले होते. मोदींना लिहिलेल्या पत्रामधून त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील इको सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. 

मनसुख वसावा हे गुजरातमधील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आदिवासी समुदायामध्ये त्यांचा मोठा जनाधार आहे. ३०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने गुजरातमधील २६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या.  

Web Title: Big blow to BJP in Gujarat, BJP Bharuch MP Mansukh Vasava resigns from the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.