अदानींना मोठा धक्का, उद्योग समुहाच्या सिमेंट कंपन्यांवर धाडी, स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:34 AM2023-02-09T10:34:18+5:302023-02-09T10:34:47+5:30
Aautam Adani : हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सिमेंटवादादरम्यान अदानी समुहाच्या काही औद्योगिक संस्थांवर स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने छापेमारी केली आहे.
हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी उद्योग समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अहवालानंतर अदानी उद्योग समुहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. दरम्यान, आता अदानी समुहाला आणखी मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सिमेंटवादादरम्यान अदानी समुहाच्या काही औद्योगिक संस्थांवर स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने छापेमारी केली आहे.
या पथकांनी बुधवारी हिमाचल प्रदेशमध्ये अदानी विल्मर ग्रुपच्या स्टोअरवर कारवाई केली. एक्साइज विभागातील साऊथ एन्फोर्समेंट झोनच्या टिमने बुधवारी संध्याकाळी परवाणू येथील अदानी स्टोअरवर जाऊन अदानी समुहाच्या रेकॉर्डची तपासणी केली.
हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समुहाला मोठा धक्का बसलेला आहे. अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र बुधवारी आदानी समुहाच्या शेअरमध्ये काहीशी वाढ होताना दिसत होती. एकीकडे विरोधी पक्ष अदानींच्या मुद्द्यावरून आक्रमक असतानाच आता हिमाचल प्रदेशमध्ये अदानी ग्रुपच्या स्टोअरवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.