केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांची मोठी घोषणा, 23 ऑगस्टला घेण्यात येणार जेईई अॅडव्हांस परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:14 PM2020-05-07T19:14:05+5:302020-05-07T19:27:46+5:30
लॉकडाउनमुळे देशातील अनेक प्रकारची कामे बंद आहेत. लॉकडाउनमुळे जेईई अॅडव्हांसची परीक्षाही होऊ शकली नव्हती.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने हात-पाय पसरले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे देशातील अनेक प्रकारची कामे बंद आहेत. लॉकडाउनमुळे जेईई अॅडव्हांस परीक्षाही होऊ शकली नव्हती. मात्र, आता 23 अॉगस्ट, 2020 रोजी ही परीक्षा घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही घोषणा केली आहे.
आणखी वाचा - Video : CoronaVirus; 4 वर्षांच्या 'या' कॅन्सर पीडित चिमुकलीने तब्बल 50 दिवसांनी घेतली वडिलांची गळाभेट
JEE Advanced Exam will be conducted on August 23: Ramesh Pokhriyal, Union Human Resource Development Minister pic.twitter.com/mZcgiB26GG
— ANI (@ANI) May 7, 2020
जवळपास 25 लाख विद्यार्थी देणार जेईई, नीटची परीक्षा -
यापूर्वी, पोखरियाल यांनी म्हटले होते, की जेईई-मेन्स परीक्षा १८ ते २३ जुलैदरम्यान, तर जेईई-अॅडव्हान्स परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल. नीट परीक्षा २६ जुलै रोजी होईल. दोन्ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेतल्या जातात. जेईईसाठी नऊ लाखांहून अधिक तर नीटसाठी १५.९३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वसाधारणपणे जूनमध्ये घेतल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रवेश परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच
विद्यार्थ्यांनी स्वत:च अभ्यास करून परीक्षांची तयारी करावी -
या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम नेहमीपेक्षा कमी करण्यात आल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेसच्या मागे न धावता स्वत: अभ्यास करून परीक्षांची तयारी करावी, असे आवाहनही पोखरियाल यांनी केले होते. यासाठी सरकारने सुरू केलेल्या स्वयम् व दीक्षा या डिजिटल शिकवण्यांचा फायदा घेता येईल.
विद्यार्थ्यांशी साधला होता व्हिडीओ संवाद -
नंतर विद्यार्थ्यांशी व्हिडीओ संवाद साधताना पोखरियाल म्हणाले होते, की आयआयटी व एनआयटी या संस्थांनी आगामी शैक्षणिक वर्षात कोणत्याही अभ्यासक्रमाची फी वाढवू नये, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. या संस्था स्वायत्त असल्या तरी त्या सरकारची विनंती मान्य करतील, अशी आशा आहे.
आणखी वाचा - Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू