India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:14 PM2020-06-16T13:14:41+5:302020-06-16T13:18:27+5:30

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे.

Big Breaking Three jawans martyred in Ladakh; violent face-off with China | India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

India China Faceoff भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

googlenewsNext

नवी दिल्ली : चीनसोबतचालडाखमधील सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. काल रात्री मागे हटण्यावरून झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. 


लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. हा तणाव निवळण्यासाठी चीन आणि भारताचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चीन आणि भारताचे जवान आमने सामने आले. त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये एका अधिकाऱ्यासह अन्य दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. 



 

या हिंसक घटनेमध्ये चीनचे सैनिकही मारले गेल्याचा दावा केला जात आहे. तसेच या घटनेत गोळीबार झाला नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चीनला किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती समोर आलेली नसून दोन्ही देशांमध्ये तणाव निवळण्यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी लष्कर प्रमुखांसोबत तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि लष्करप्रमुख नरवणे हजर होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

Read in English

Web Title: Big Breaking Three jawans martyred in Ladakh; violent face-off with China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.