Petrol Diesel Prices Reduced: केंद्राचा मोठ्ठा दिलासा; पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी होणार स्वस्त; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:19 PM2022-05-21T19:19:21+5:302022-05-21T19:40:03+5:30

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली माहिती

Big Breking Petrol Diesel Prices Reduced as Centre reduces excise duty on petrol by rupees 8 and on diesel by Rupees 6 per litre Finance Minister Announces | Petrol Diesel Prices Reduced: केंद्राचा मोठ्ठा दिलासा; पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी होणार स्वस्त; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

Petrol Diesel Prices Reduced: केंद्राचा मोठ्ठा दिलासा; पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी होणार स्वस्त; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

googlenewsNext

Big Breaking News, Petrol Diesel Prices Reduced:  महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देशातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. याबाबतची माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैशाने तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होतील."

७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. दुधापासुन सर्व पदार्थांच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता होती.

केंद्राने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये देखील एक्साईज ड्युटीमध्ये कपात केली होती. तेव्हा सरकारने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांचा कर कमी केला होता. सध्या पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 27.90 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 21.80 रुपये आकारली जाते. केंद्रात वेगळे सरकार आणि राज्यात वेगळ्या पक्षांचे सरकार असल्याने फक्त केंद्रानेच कमी केलेल्या दरांचा फायदा झाला. राज्य सरकारने दर कमी करण्यास सपशेल नकार दिला होता. यामुळेच राज्यात पेट्रोल, डिझेल इतरांच्या तुलनेत महाग होते.

Web Title: Big Breking Petrol Diesel Prices Reduced as Centre reduces excise duty on petrol by rupees 8 and on diesel by Rupees 6 per litre Finance Minister Announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.