'अतुल्य भारत'च्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी बिग बी
By admin | Published: January 7, 2016 07:10 PM2016-01-07T19:10:47+5:302016-01-07T19:10:47+5:30
आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खान ऐवजी बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता.
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खान ऐवजी बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता. त्याच्या करार संपल्यानंतर आता पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती केली आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदासाठी अभिनेता अक्षय कुमार, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची नावे सुद्धा चर्चेत होती. मात्र, यात अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन गुजरातच्या पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर आहेत.
पर्यटन मंत्रालयाच्या अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान गेली दहा वर्ष होता, त्याचा करार संपल्यानंतर आता त्याच्याजागी अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.