देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचं मोठ योगदान - नरेंद्र मोदी
By admin | Published: November 27, 2015 06:27 PM2015-11-27T18:27:06+5:302015-11-27T18:36:25+5:30
देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाने मोठे योगदान दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. संसदेत संविधान चर्चा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, २७ - देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाने मोठे योगदान दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. संसदेत संविधान चर्चा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. यावेळी त्यांनी संविधानात बदल करण्याविषयी कुणीही विचार करू शकत नाही. तसेच, संविधानात बदल करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अपमानाचं विष पचवलं आणि आपल्याला संविधानाचं अमृत दिलं आहे. त्यामुऴे आपलं संविधान हे सर्व भारतीयांसाठी आत्मसन्मान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील काही भाषणांचे मुद्दे : -
- 'आयडिया ऑफ इंडिया' जनसेवा ही प्रभुसेवा आहे.
- कामगारांसाठी लवकरच बोनस कायदा संसदेत मांडणार असून कामगारांना किमान ७ हजार रुपयांचा बोनस मिळणार
- संविधानात बदल करण्याविषयी कुणी विचारही करू शकत नाही. संविधान बदलने म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे.
- अधिकारांची चर्चा खूप होते, जबाबदारी आणि कर्तव्यांचे भान ठेवले जात नाही. अधिकारांपेक्षा कर्तव्यांची चर्चा झाली आणि कामाला सुरुवात केल्यास देशाचे भले होईल.
- वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले कारण त्यावेळी मुख्यमंत्री झालेल्या खासदाराने नियमाचा फायदा घेत मतदान केले होते पण वाजपेयींनी लोकशाही व्यवस्थेचा मान राखला.
- आपल्याकडे एक वेळ आली, त्यावेळी नेत्यांच्या संख्येत वाढ झाली, तेव्हा कोटा सिस्टम आली. त्यावर आम्ही नियम लावले. यावर आम्ही गर्व करु शकतो.
- भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.
- संसदेत एका बाजूला जास्त लोकं असले म्हणून वाटेल ती गोष्ट करता येत नाही, त्यासाठी सगळ्यांचेच सहकार्य हवं आहे .
- संविधानाच्या चौकटीत राहून सरकारी यंत्रणेने काम केले आणि विरोधकांनीही या चौकटीतच आपला विरोध प्रकट केला तर व्यवस्था आणखी सक्षम होईल पण संविधानाची चौकट मोडल्यास देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होईल.
- आपलं संविधान स्पष्ट आणि पारदर्शक आहे.
- संविधान हे भारतीयांसाठी आत्मसन्मान आहे.
- सरकरावर प्रहार करायचा असेल किंवा विरोध करायचा असले किंवा बचाव करायचा असेल तर त्यासाठी संविधानचीच गरज लागते.
- बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अवहेलना सहन केली मात्र संविधानात त्यांनी कधीही सूडाची भावना येऊ दिली नाही
- बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानाचं विष पचवलं आणि आपल्याला संविधानाचं अमृत दिलं.
- जगात जे १२ धर्म आहेत त्यांचा सन्मान करणारे, १२२ भाषा आणि १६०० पेक्षा जास्त बोलीभाषा असलेल्या विविधतांनी भरलेल्या, आस्तिक-नास्तिक जिथे एकत्र नांदतात अशा भारतासाठी संविधान तयार करणे खूप आव्हानात्मक होते.
- संविधानाची माहिती पुढच्या पिढ्यांना व्हावी हे आपलं कर्तव्य आहे.
- संविधान बनविताना जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधान सामाजिक दस्ताऐवज होऊ शकलं नसतं.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवढा व्यापक विचार केला होता हे आजही कायम जाणवत राहतं.
- संविधान लोकांपर्यंत नेण्यासाठी स्पर्धा, परीक्षा, कार्यक्रम असे उपक्रम आपल्याला राबवता येतील .
- देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचं मोठ योगदान आहे.
- भारतासारख्या देशाचं संविधान बनविणं म्हणजे फारच कठीण काम आहे, तसेच, हा देश राजे - महाराजांनी नव्हे, तर सामान्य जनतेने उभा केला आहे.
- आम्हाला एवढं चांगलं संविधान मिळालं आहे की, ज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
- हा देश सत्ताधिका-यांनी बनविला नसून देशातील करोडो जनतेने बनविला आहे.
- या संविधानाचा आपण जितका गौरव करु तितका कमीच आहे.
- २६ नोव्हेंबर हा एक ऐतिहासिक दिवस असून संविधान निर्मिती प्रक्रियेतला हा एक महत्त्वाचा दिवस आहे.
- आत्तापर्यंत जितके पंतप्रधान झाले त्यांच्या योगदानामुळे हा देश तयार झाला असून यांच्यासोबतच यामध्ये अनेकांचे योगदानही आहे.