मोठी डील! बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रिटेलमधील 'बेताज बादशाह'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 10:19 PM2020-08-29T22:19:12+5:302020-08-29T22:20:02+5:30

बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे.

Big deal! Reliance acquire Future group Retail business Big Bazar and other wings | मोठी डील! बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रिटेलमधील 'बेताज बादशाह'

मोठी डील! बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रिटेलमधील 'बेताज बादशाह'

Next

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने  फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे. 


हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL  ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. 


रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स 1200 कोटी रुपये गुंतवणार आहे. तसेच 6.09 टक्के हिस्साही खरेदी करणार आहे. याशिव्या 400 कोटी रुपये इक्विटी वॉरंटच्या रुपात गुंतविणार आहे. यामुळे एकूण 7.05 टक्के हिस्सा हा रिलायन्सकडे राहणार आहे. 

Netmeds ची खरेदी

रिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये (Netmeds) 60 टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने ही डील 620 कोटींमध्ये केली असून मंगळवारी याची घोषणा केली. RRVL ने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के मालकी खरेदी केली आहे. 

Unlock4: केंद्राला विचारल्याशिवाय कुठेही संपूर्ण लॉकडाऊन नको; राज्य सरकारांच्या अधिकारांना कात्री

Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद

Unlock4: ई-पासचे बंधन संपले; देशात लॉकडाऊन 31 सप्टेंबरपर्यंत वाढला

Web Title: Big deal! Reliance acquire Future group Retail business Big Bazar and other wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.