दिल्लीकरांना 'फ्री' इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:25 PM2019-08-08T16:25:35+5:302019-08-08T16:26:15+5:30

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांसाठी महत्तपूर्ण घोषणा केल्या आहेत.

Big decision of Kejriwal government for Delhikar, Free wi fi and internet | दिल्लीकरांना 'फ्री' इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीकरांना 'फ्री' इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

Next

नवी दिल्ली -  दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे आम्ही निवडणुकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत. त्यामुळे निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन असं काहीही नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांसाठी महत्तपूर्ण घोषणा केल्या आहेत. दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तर, सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून चोरीसारख्या घटनांना आळाही बसत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार असून 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. तर, उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डेटा दरमहा वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे. दिल्लीतील मोफत इंटरनेट सेवा पीपीपी तत्वाने सुरू करण्यात येत असून यासाठी 100 कोटींचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.  

Web Title: Big decision of Kejriwal government for Delhikar, Free wi fi and internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.