दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 03:12 PM2023-06-30T15:12:58+5:302023-06-30T15:13:43+5:30

एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनच्या प्रावधानानुसार दिल्ली मेट्रोमध्ये आत्तापासून प्रति व्यक्ती दोन दारुच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे

Big decision of Delhi Metro, passengers are allowed to carry two bottles of liquor | दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी

दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतीलमेट्रो चांगलीच चर्चेत आहे. कुणाच्या कपडे परिधान करण्यामुळे, तर कधी मेट्रोतच अश्लील चाळे सुरू झाल्यामुळे ही मेट्रो चर्चेत होती. आता, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या एका निर्णयामुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने दारुच्या दोन बाटल्या घेऊन प्रवास करण्यास संमती दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना, डीएमआरसीने अधिकारीक विधान जारी केलं असून दिल्ली मेट्रोच्या नियमांत बदल केल्याचं सांगण्यात आलंय. 

एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनच्या प्रावधानानुसार दिल्ली मेट्रोमध्ये आत्तापासून प्रति व्यक्ती दोन दारुच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. CISF आणि DMRC च्या अधिकाऱ्यांच्या एका कमेटीने पहिल्या आदेशाची समिक्षा केली आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार, केवळ एअरपोर्ट लाईनवरील मेट्रोमध्येच सीलबंद दारुच्या बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी होती. याशिवाय इतर मेट्रो लाईनवर बंदी होती. मात्र, आता नवीन आदेश हा सर्वच मेट्रो लाईनवर लागू होत आहे. पण, मेट्रोमध्ये दारु पिण्यास परवानगी नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रवाशांना दिल्ली मेट्रोल कार्पोरेशनकडून अपील करण्यात आलं आहे. 


दरम्यान, प्रवास करताना योग्य वर्तणूक आणि शिष्टाचार ठेवावा लागणार आहे. जर एखादा प्रवाशी दारुच्या नशेत विचित्र व्यवहार करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दिल्ली मेट्रोतून दररोज लाखो प्रवाशांना एका जागेहून दुसऱ्या जागेवर नेण्यात येते. कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी दिल्ली मेट्रो एक वरदानच आहे. म्हणूनच, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने काही नियमांत बदल केले आहेत. 
 

Web Title: Big decision of Delhi Metro, passengers are allowed to carry two bottles of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.