तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय! एसटी प्रवर्गाला ६ वरुन १० टक्के दिले आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:52 PM2022-10-01T12:52:01+5:302022-10-01T22:04:14+5:30
तेलंगणा सरकारने शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये एसटी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या या प्रवर्गाला ६ टक्के आरक्षण दिले आहे.
तेलंगणा सरकारने शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये एसटी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या या प्रवर्गाला ६ टक्के आरक्षण दिले आहे. यात ४ टक्क्यांनी वाढ करुन ते आता १० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव एका सभेत ही घोषणा केली आहे. सरकार लवकरच सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण मर्यादा १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
5G मुळे देशात इंटरनेट क्रांती, मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर - पंतप्रधान
२०१७ मध्ये विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.हे विधेयक राष्ट्रपती यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. गेल्या सुमारे ६ वर्षांत राज्य सरकारने यासंदर्भात अनेक अर्ज पाठवले आहेत,पण हे प्रकरण अजुनही प्रलंबित आहे, असं शासन आदेशात म्हटले आहे.
तेलंगणा सरकारने शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमधील प्रवेशांमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण मर्यादा ६ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा आदेश जारी करण्यात आला.