केंद्राचा मोठा निर्णय! दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 07:43 PM2023-09-18T19:43:12+5:302023-09-18T19:44:24+5:30
दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात तीन महत्वाचे अधिकारी शहीद झाले होते.
दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात तीन महत्वाचे अधिकारी शहीद झाले होते. यानंतर जंगलात अड्डे बनविलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. यातच दहशतवाद्यांनी जंगलांना अड्डे बनविल्याने आता कोब्रा कमांडोंनाच उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोब्रा कमांडोंच्या पहिल्या बॅचने नुकतेच जम्मूच्या जंगलात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या कमांडोंना कुपवाडामध्ये तैनात करण्यात आले आहे.
संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण
२००९ मध्ये कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन (CoBRA) ची माओवादी बंडखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. आता त्यांना पहिल्यांदाच मध्य आणि पूर्व भारतातून काढून जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आले आहे.
सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो फोर्सची एक विशेष तुकडी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवली आहे. जंगल आणि पर्वतांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या पद्धतींवर कोब्रा विशेष नजर ठेवून आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाईची गरज भासल्यास तेथे उपस्थित असलेल्या दलांनाही त्याची मदत होईल. कोब्रा कमांडोना जंगल युद्धात नैपुण्य आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या जंगलात आणि पर्वतांमध्ये लपून सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. कोब्रा कमांडोंना जंगलात लढण्याचे कौशल्य आहे, त्यामुळे ते जम्मू-काश्मीरच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊ शकतात.
बिहार आणि झारखंड येथील कोब्रा टीमला हलवण्यात आले आहे. तेथील नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या जंगलात त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. आता प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना कुपवाडा येथे तैनात करण्यात आले आहे, तरीही अद्याप कोणत्याही कारवाईत त्यांचे सहकार्य घेण्यात आलेले नाही.
सोमवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या तीन ओव्हर-ग्राउंड वर्कर यांना PSA अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौसिफ-उल-नबी, झहूर-उल-हसन आणि रियाझ अहमद यांना ताब्यात घेण्यात आले.