पीएफआय संदर्भात मोठा खुलासा! व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानी, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 19:07 IST2022-10-18T19:06:24+5:302022-10-18T19:07:04+5:30
गेल्या काही दिवसापूर्वी देशभरातील पीएफआय कार्यालयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह राज्यातील पोलिसांनी छापे टाकले. यानंतर या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षासाठी बंदी आणली.

पीएफआय संदर्भात मोठा खुलासा! व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानी, वाचा सविस्तर
गेल्या काही दिवसापूर्वी देशभरातील पीएफआय कार्यालयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह राज्यातील पोलिसांनी छापे टाकले. यानंतर या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षासाठी बंदी आणली आहे. आता पीएफआय संदर्भात नवीन खुलासे होत आहेत. ताब्यात घेतलेल्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पीएफआय सदस्यांचे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. ग्रुपचा एक अॅडमिन पाकिस्तानचा असल्याचे तपासात समोर आले आहे.
देशविरोधी कारवायांसाठी त्यांना अटक करण्यात आली होती. भारतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
एटीएसने केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी १७५ सदस्य होते, त्यापैकी बरेच जण अफगाणिस्तान आणि यूएईचे होते. अनेक सदस्यांनी परदेशात प्रवास करून परदेशात अनेक व्यवहार केले होते त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस आणि ईडीने मोठी देशव्यापी कारवाई केली होती.
महाराष्ट्र एटीएसने पाच जणांना मालेगाव, कोल्हापूर, बीड आणि पुणे येथून अटक केली. अधिकाऱ्यांनी तपासासाठी त्यांचे मोबाईल फोन, कॉम्पुटर, हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि त्यांची बँक कागदपत्रे जप्त केली होते. यावेळी त्यांच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले होते. हे सदस्य बंदी घातलेल्या सिमी या संघटनेप्रमाणेच काम करत होते.
हवामानात बदल, बंगालच्या उपसागरात तयार होतंय मोठं चक्रिवादळ, या राज्यात पडणार मुसळधार पाऊस
२६ वर्षीय मौलाना सैफुर रहमान सईद अहमद अन्सारी, ४८ वर्षीय अब्दुल कय्युम बदुल्ला शेख आणि ३१ वर्षीय रजी अहमद खान, २९ वर्षीय वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आणि बीड येथील मौला नसीब मुल्ला. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.