ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठा स्फोट; 14 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 08:06 PM2020-02-08T20:06:11+5:302020-02-08T20:06:22+5:30
पंजाबमध्ये शीख समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात फटाक्यांच्या ट्रॉलीला आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
चंदीगडः पंजाबमध्ये शीख समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात फटाक्यांच्या ट्रॉलीला आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ट्रॉलीला आग लागल्यानंतर स्फोटही झाला असून, जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
पंजाबमध्ये शीख समाजाकडून नगर कीर्तन हा धार्मिक कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्याचदरन्यान तरनतारन जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्याचदरम्यान काही फटाक्यांची ठिणगी ट्रॉलीमध्ये पडली आणि बघता बघताच ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लागली.
Amritsar IG-border range Sarinderpal Singh Parmar: 2 people have been killed in the accidental explosion and 11 have been injured. The numbers given by the SSP was according to the eyewitnesses. #Punjabhttps://t.co/928M50R16A
— ANI (@ANI) February 8, 2020
या ट्रॉलीमध्ये फटाके फुटल्यानंतर भीषण स्फोट झाला. धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक लोक पहुविंड ठिकाणाहून गुरुद्वाऱ्यात जाण्यासाठी रवाना होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Tarn Taran SSP Dhruv Dahiya: During nagar kirtan, firecrackers were being burnt using explosive material because of which tractor-trolley exploded accidentally. According to eyewitnesses,14-15 individuals died on spot&3 have been admitted to hospital in critical condition.#Punjabhttps://t.co/bIa6fsyQ0Mpic.twitter.com/b11WYDEXKh
— ANI (@ANI) February 8, 2020