राज्यसभा निवडणुकीत मोठा खेळ! हिमाचलमध्ये ९, उत्तर प्रदेशमधील ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:59 PM2024-02-27T12:59:48+5:302024-02-27T13:01:29+5:30
उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात आज राज्यसभेतील १५ जागांसाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची भीती आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आज निवडणूक होत आहे. यूपीमधील १०, कर्नाटकातील ४ आणि हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठी मतदान सुरू आहे. तिन्ही राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंग होण्याची शंका आहे. यूपीमध्ये समाजवादी पक्षाच्या ८ आमदारांबाबत सस्पेन्स आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून, ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, तर रात्रीपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त आहेत. यापैकी १२ राज्यांतील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मनोज जरांगेंची SIT चौकशी होणार, सत्य समोर आलं पाहिजे; CM एकनाथ शिंदे कडाडले
तीन राज्यांमध्ये सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात आतापर्यंत ६८ पैकी ६७ आमदारांचे मतदान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील ९ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मोठा खेळ झाला आहे, सपामधील ७ आमदारांनी पक्ष बदलून भाजप उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपला पाठिंबा देणारे बदायूं येथील सपा आमदार आशुतोष मौर्य आहेत. यापूर्वी हंडिया येथील सपा आमदार हकीम चंद्र बिंद यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला होता. याशिवाय सपाच्या ५ आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यामध्ये अभय सिंग, राकेश सिंग, राकेश पांडे, विनोद चतुर्वेदी, मनोज पांडे यांच्या नावांचा समावेश आहे. म्हणजेच आतापर्यंत सपाच्या ७ आमदारांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे.