राज्यसभेत मोठा 'खेला'! माजी BJD खासदार ममता मोहंता भाजपात, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 06:57 PM2024-08-01T18:57:59+5:302024-08-01T18:58:32+5:30

ममता मोहंता 2020 मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता.

Big game in the Rajya Sabha Former BJD MP Mamata Mohanta in BJP | राज्यसभेत मोठा 'खेला'! माजी BJD खासदार ममता मोहंता भाजपात, म्हणाल्या...

राज्यसभेत मोठा 'खेला'! माजी BJD खासदार ममता मोहंता भाजपात, म्हणाल्या...

नुकत्याच झालेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बीजेडीचा पराभव करत सत्तेवर आला आहे. यानंतर, आता भाजपने येथे आपली ताकद वाढवायलास सुरुवात केली आहे. बीजेडीच्या माजी खासदार ममता मोहंता (Mamata Mohanta) यांनी बुधवारी (31 जुलै 2024) राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी त्याच्या राजीनाम्याला मंजुरी दिली होती.

ममता मोहंता भाजपात
यानंतर बीजू जनता दलाच्या माजी राज्यसभा खासदार ममता मोहंता यांनी गुरुवारी (1 ऑगस्ट 2024) भाजपात प्रवेश केला. ममता यांनी बीजेडीचाही राजीनामा दिला होता. ममता मोहंता 2020 मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता.

काय म्हणाल्या ममता -
भाजप प्रवेशासंदर्भात बोलताना ममता म्हणाल्या, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसेवेने प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कोणत्याही कटाचा भाग म्हणून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही." 

याच बरोबर, बीजेडीमध्ये आपली उपेक्षा केले जात होते, असा आरोही त्यांनी यावेळी केला. ममता मोहंता यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि पक्षाचे ओडिशा प्रभारी विजयपाल सिंह तोमर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. 

Web Title: Big game in the Rajya Sabha Former BJD MP Mamata Mohanta in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.