Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:35 IST2025-01-31T13:36:41+5:302025-01-31T14:35:52+5:30
Varanasi Boat Accident: गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट जवळ शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बचाव सुरू आहे.

Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू
शुक्रवारी वाराणसीतील मान मंदिर घाटाजवळ ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जल पोलीस आणि खलाशांच्या मदतीने सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. बोटीवरील सर्व भाविक ओरिसाचे रहिवासी आहेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट ओलांडून एक मोठी बोट आणि एक लहान बोट यांच्यात टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाला. बोटीतील सर्व भाविकांनी लाईफ जॅकेट घातले होते, यामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवता आले. घटनास्थळी जल पोलीस आणि एनडीआरएफची टीम उपस्थित आहेत.
या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनडीआरएफचे बचाव कर्मचारी गंगा नदीतून प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
VIDEO | Uttar Pradesh: A boat capsizes in Ganga River in #Varanasi. Several people rescued. More details are waited.
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/jAlw1QsgSS
काही दिवसापूर्वी चेंगराचेंगरी झाली होती
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर, महाकुंभमेळा प्रशासन आणि प्रयागराज जिल्हा प्रशासन प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत आहे. प्रयागराज आयुक्तालयातून डायव्हर्शन स्कीम काढून टाकण्यात येत आहे.
महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव
काही दिवसापूर्वी या मेळामध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा आग लागल्याची बातमी समोर आली आहे. चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत १५ तंबू जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले. तेथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अग्निशमन दलाला तंबूपर्यंत पोहोचण्यास अडचण आली. असे असूनही, अग्निशमन दल वेळेवर पोहोचले आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली.