प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीकडून मोठी चूक, देशाचा नकाशाच 'बदलला'!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 08:59 AM2020-01-27T08:59:14+5:302020-01-27T12:57:36+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी चूक झाली
मुंबई - देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन रविवारी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त मान्यवर व्यक्ती, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या अधिकृत फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी चूक झाली असून, शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबूक अकाऊंटवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशाच्या नकाशा वापरला आहे. मात्र हा नकाशा निवडताना मोठी चूक झाली असून, देशाच्या अधिकृत नकाशा ऐवजी चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. या नकाशामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई चीन हे भाग नकाशात दाखवण्यात आलेले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवर प्रसिद्ध झालेल्या शुभेच्छा संदेशातील देशाचा नकाशा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध झालेल्या शुभेच्छा संदेशातील देशाचा नकाशा
लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !
— NCP (@NCPspeaks) January 26, 2020
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !#RepublicDay2020pic.twitter.com/ognpGPx50N
देशाच्या अधिकृत नकाशातील जम्मू काश्मीर आणि लडाख
भारताचा संपूर्ण नकाशा