एक मोठा गैरसमज : फेसबुक तुमचे सर्व फोटो डिलीट करणार

By admin | Published: June 16, 2016 11:52 PM2016-06-16T23:52:25+5:302016-06-16T23:52:25+5:30

जर सात जुलै पूर्वी मोमेंटस हे अ‍ॅप जर डाउनलोड केले नाही तर फेसबुक सर्व फोटो डिलीट करणार.

A big misunderstanding: Facebook will delete all your photos | एक मोठा गैरसमज : फेसबुक तुमचे सर्व फोटो डिलीट करणार

एक मोठा गैरसमज : फेसबुक तुमचे सर्व फोटो डिलीट करणार

Next

अनिल भापकर

सध्या फेसबुक युझर्सला एक फार मोठी चिंता सतावते आहे ती म्हणजे जर सात जुलै पूर्वी मोमेंटस हे अ‍ॅप जर डाउनलोड केले नाही तर फेसबुक सर्व फोटो डिलीट करणार. आपले फेसबुक वरील सर्व फोटो डिलीट होणार या भीतीने अनेक फेसबुक युझर्स ला ग्रासले आहे . अनेकांनी केवळ फोटो डिलीट होतील या भितीपोटी मोमेंटस हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.
त्याला कारण सुद्धा तसेच आहे फेसबुक ने त्यांच्या युझर्स ला फोटो डिलीट करण्याची ताकीद दिली आहे. फेसबुक ने तसे इमेल त्यांच्या युझर्स ला पाठविले आहे. मात्र याविषयी सध्या फार गैरसमज पसरले आहेत. फेसबुक ने युझर्स ला पाठविलेले इमेल मध्ये सर्व फोटो डिलीट करणार असे म्हटलेले नाही तर फ़क़्त सिंक केलेले फोटोच डिलीट करणार असे म्हटलेले आहे. त्यामुळे तुमचे सर्व फेसबुक फोटो डिलीट होणार हे खरे नाही.

सिंक केलेले फोटो म्हणजे नेमके काय ?
फेसबुक ने २०१२ मध्ये मोबाइल अ‍ॅप युझर्स साठी फोटो सिंक ही सुविधा सुरु केली होती .त्यामध्ये युझर्स ने त्यांच्या मोबाइल मधून काढलेले फोटो डायरेक्ट फेसबुक अकाउंट मध्ये अपलोड होण्याची ही सुविधा होती . त्यासाठी फेसबुक अ‍ॅप मध्ये सेटिंग मध्ये जाऊन सिंक फोटो ही सुविधा चालू करावी लागे. त्यानंतर तुमच्या मोबाईल द्वारे काढलेले फोटो फेसबुक अकाउंट ला आपोआप अपलोड होत अशी ही सुविधा होती . हे अपलोड झालेले फोटो फ़क़्त तुम्हीच पाहू शकत होता . नंतर फेसबुक वर जाउन कुठले फोटो मित्रांसोबत शेअर करायचे हे तुम्ही ठरवु शकत होता. हे मोबाइल वरून आपोआप अपलोड झालेले फोटो म्हणजे सिंक फोटो .
मात्र यावर्षी जानेवारी पासून फेसबुक ने ही फोटो सिंकची सुविधा काढून घेतली आणि त्याएवजी मोमेंटस हे अ‍ॅप युझर्स च्या सेवेत आणले . तुम्ही मोमेंटस हे अ‍ॅप सात जुलै पर्यंत डाउनलोड केले नाही तर केवळ हे सिंक फोटोच डिलीट करण्याची ताकीद फेसबुक ने आपल्या युझर्स ला दिली आहे .जर तुम्हाला मोमेंटस हे अ‍ॅप वापरायचे नसेल तर तुम्ही सात जुलै पूर्वी तुमचे सिंक फोटो तुमच्या संगणकावर डाउनलोड करू शकता आणि जर तुम्ही फेसबुक ची फोटो सिंक ही सुविधाच ऑन केली नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही कारण तुम्ही अपलोड केलेले इतर सर्व फोटो फेसबुक वर जसेच्या तसे राहणार आहे.

Web Title: A big misunderstanding: Facebook will delete all your photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.