China on LAC: चीनच्या एलएसीवर जोरदार हालचाली; 50000 सैनिक, शस्त्रास्त्रे तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:34 AM2021-09-27T08:34:35+5:302021-09-27T08:35:03+5:30

China’s military movement in Ladakh: चिनी सैन्याची ड्रोन हालचाली या दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आणि या भागातील अन्य ठिकाणी दिसत आहे. चीनच्या या हालचालींवर भारतीय जवान लक्ष ठेवून आहेत. 

big movements on China’s LAC in Ladakh; 50,000 troops, weapons deployed | China on LAC: चीनच्या एलएसीवर जोरदार हालचाली; 50000 सैनिक, शस्त्रास्त्रे तैनात

China on LAC: चीनच्या एलएसीवर जोरदार हालचाली; 50000 सैनिक, शस्त्रास्त्रे तैनात

Next

एलएसीवर चीनने (China) मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने 50000 हून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या खूप जवळून ड्रोन उडविले जात आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर सुरु झाला आहे. तसेच सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ तयार करण्यात येत असून या तळांवर शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. (China consolidating military positions near LAC, more PLA shelters built at 8 eight locations)

एएनआयला अधिकृत सूत्रांनी सांगितले की, चिनी सैन्याची ड्रोन हालचाली या दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आणि या भागातील अन्य ठिकाणी दिसत आहे. चीनच्या या हालचालींवर भारतीय जवान लक्ष ठेवून आहेत. 

भारतीय जवान वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून चीनच्या या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. भारतही आता मोठ्या प्रमाणावर ड्रोन तैनात करत असून लवकरच या ठिकाणी इस्त्रायल आणि भारतीय ड्रोन पाठविले जाणार आहेत. एलएसीवर हे ड्रोन तैनात करण्यासाठी संरक्षण दलांना परवानगी देण्यात आली आहे. 

एलएसीवर सध्या परिस्थिती खूप नाजूक आहे. फ्रिक्शन पॉईंटचा मुद्दा सोडविण्याची गरज आहे. चीन सध्या शांत बसलेला नाही. तो आपल्या सैनिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांचा सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करत आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवर आणि तिबेटी गावांमध्ये चीनने सैन्य शिबिरे सुरु केली आहेत. 

Web Title: big movements on China’s LAC in Ladakh; 50,000 troops, weapons deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.