Covaxin for Childrens: मोठी बातमी! आता लहान मुलांच्या 'Covaxin' ची दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:51 AM2021-05-12T08:51:00+5:302021-05-12T08:55:00+5:30
Bharat Biotech Covaxin 2-18 Years vaccination trials approval soon: अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी केली जाणार आहे. एक्सपर्ट समितीने मंगळवारी शिफारस केली आहे.
Bharat Biotech Covaxin for Childrens: नवी दिल्ली : अमेरिकेने 12 ते 15 वयोगटाच्या मुलांसाठी फायझरच्या लसीला लसीकरणासाठी (Corona Vaccination) परवानगी दिलेली असताना आता भारतातूनही एक आनंदाची बातमी येत आहे. देशात कोरोना महामारीविरोधात लढ्यामध्ये लहान मुलांसाठी भारत बायोटेक (Bharat Biotech) लस बनवत आहे. 2 ते 18 वयोगटातील बालके आणि मुलांच्या या लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्य़ा टप्प्यातील चाचण्यांसाठी एक्सपर्ट समितीने मंगळवारी शिफारस केली आहे. (Covaxin’ for phase II and phase III clinical trial on children between the age of two and 18 years.)
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी केली जाणार आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या कोरोनावरील तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी भारता बायोटेकने दिलेल्या अर्जावर चर्चा केली. यामध्ये भारत बायोटेकने बनविलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दोन ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये सुरक्षा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह अन्य गोष्टींचे आकलन करणे आणि चाचणीच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्प्याला परवानगी देणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
Subject Expert Committee (SEC) gives nod to Bharat Biotech's Covaxin for phase 2 and 3 human clinical trials on 2 to 18-year-olds: Sources#COVID19pic.twitter.com/0FD1y3IGYh
— ANI (@ANI) May 12, 2021
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सने अशी बातमी दिली होती की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (18+) बदलणाऱ्या कोरोना व्हायरसविरोधात अँटबॉडी बनविण्यास प्रभावी आहे. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या चाचणीचे निकाल घोषित करण्यात आले. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. सामान्य कोरोना रुग्णांवर कोरोनाची लस ही 78 टक्के प्रभावी आहे, असे म्हटले होते.
अमेरिकेत उद्यापासून 12-15 वयोगटासाठी लसीकरण
कोरोना महामारीच्या (Corona Virus) विरोधात सुरु असलेल्या लढ्याला अमेरिकेमधून मोठी दिलासादायक बातमी येत आहे. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला (Corona Vaccine) मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस किशोरवयीनांना दिली जाणार आहे. गुरुवारपासून अमेरिकेत या वयोगटासाठी लसीकरण सुरु होऊ शकते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कंपन्यांनी ही लस मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. लस घेतल्यानंतर कोणतेही 'साइड इफेक्ट' देखील होत नसल्याचं कंपनीनं म्हटले होते. या लसीला साधारण दीड महिन्यांनी अमेरिकेने परवानगी दिली आहे. एफडीएचे कार्यवाहक आय़ुक्त जेनेट वुडकॉक यांनी या पावलाला कोरोना महामारीविरोधातील महत्वाचा टप्पा म्हटले आहे.