मोठी बातमी: जम्मू-काश्मीरसह हरियाणातील निवडणूक तारखांची घोषणा; 'या' दिवशी लागणार निकाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 03:42 PM2024-08-16T15:42:25+5:302024-08-16T15:43:19+5:30
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Election Commission ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आज जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर हरियाणातील निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील मतमोजणी करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणुका होणार असून एकूण ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जम्मूतील ४३ आणि काश्मीरमधील ४७ जागांचा समावेश असणार आहे. निवडणूक आयोगाने जम्मूमधील सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूर या भागातील एक-एक जागा वाढवण्यात आली असून काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक विधानसभा मतदारसंघ वाढवण्यात आला आहे," अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.
Assembly Elections in Jammu and Kashmir | Chief Election Commissioner Rajiv Kumar says, "Assembly Elections will be held in three phaseS; voting on September 18th, September 25th, and October 1st. Counting of votes will take place on October 4" pic.twitter.com/g4eqB62jjh
— ANI (@ANI) August 16, 2024
दरम्यान, "लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. जम्मू काश्मीरमधील लोकांना चित्र बदलायचे असून ते निवडणुकांसाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे," असंही राजीव कुमार म्हणाले.