मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:07 PM2020-07-09T20:07:34+5:302020-07-09T20:09:30+5:30
काऊंन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने याची माहिती जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, ICSE बोर्डाने दहावी आणि बारावीचे निकाल उद्या जाहीर केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
काऊंन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने याची माहिती जाहीर केली आहे. 10 जुलै 2020 ला ICSE बोर्डाने दहावी आणि बारावीचे निकाल दुपारी तीन वाजता जाहीर होणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
Results of Class 10 (ICSE) and Class 12 (ISC) year 2020 examinations to be declared on 10th July at 3:00 pm: Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) pic.twitter.com/Tci4UDpvMI
— ANI (@ANI) July 9, 2020
CBSE बोर्डाच्या निकालांची तारीख काही ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. ती खोटी असल्याचे आज दुपारीच सीबीएसईने जाहीर केले होते. अधिकृत तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचे म्हटले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट
भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार
भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला
सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश
शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय
ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी