मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:55 PM2024-01-24T15:55:45+5:302024-01-24T16:06:47+5:30
Mamata Banerjee Latest Update: येणारी लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस एकट्यानेच लढणार असल्याची घोषणा ममता यांनी केली होती.
काँग्रेसच्या अडेलतट्टुपणामुळे येणारी लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकाळी केली होती. यानंतर दुपारी साडे तीनच्या सुमारास ममता यांच्या कारला अपघात झाला आहे.
ममता बॅनर्जी या कोलकाता येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासह जात होत्या. यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये ममता यांच्या डोक्याला जखम झाली आहे. बर्धमानहून ममता या कोलकाता येथे परतत होत्या. यावेळी पाऊस सुरु होता. या पावसामुळे धुक्याचे वातावरण पसरले होते.
ममता यांच्या ताफ्यातील कारनी काही दिसत नसल्याने ब्रेक लावले. यामुळे ममता यांच्या चालकालाही अचानक ब्रेक मारावे लागले. यामुळे ममता यांचे डोके पुढील डॅशबोर्डवर आदळले. यामुळे ममता यांना दुखापत झाली आहे.
बर्धमानला त्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. त्या तिथून हेलिकॉप्टरने परतणार होत्या. परंतु खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने जाता आले नाही. यामुळे त्यांनी रस्ते मार्गे परतण्याचा निर्णय घेतला होता.