Narendra Modi : मोठी बातमी! नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार?; सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 01:10 PM2024-06-05T13:10:07+5:302024-06-05T13:15:53+5:30

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

Big news Narendra Modi to be sworn in as Prime Minister on June 8 NDA will form the government for the third time | Narendra Modi : मोठी बातमी! नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार?; सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

Narendra Modi : मोठी बातमी! नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार?; सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

Pm Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे काल निकाल समोर आले. एनडीएने मोठी आघाडी घेत बहुमत मिळवले. दरम्यान, आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

"काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार"

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता. आज दुपारी ४ वाजता दिल्लीत एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. यात जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि शपथविधी यावर चर्चा होणार आहे. 

जेडीयू प्रमुख नितीश कुमार बुधवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. चंद्राबाबू नायडूही दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचू शकतात. २०१९ च्या निकालानंतर ७ दिवसांनी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. २०१४ मध्ये जेव्हा NDA सरकार स्थापन झाले तेव्हा १० दिवसांनी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

लोकसभेचा निकाल 

लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले आहे. एनडीएने २९२ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. तर अपक्ष ७ उमेदवार जिंकले आहेत. 
 

Web Title: Big news Narendra Modi to be sworn in as Prime Minister on June 8 NDA will form the government for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.