मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIAच्या मुंबई ब्रांचला मिळाला धमकीचा ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 03:38 PM2022-04-01T15:38:20+5:302022-04-01T15:39:22+5:30

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात होता.

Big news PM Modi threatened to kill NIA's Mumbai branch receives threatening e-mail plan to attack with 20 kg RDX | मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIAच्या मुंबई ब्रांचला मिळाला धमकीचा ईमेल

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIAच्या मुंबई ब्रांचला मिळाला धमकीचा ईमेल

googlenewsNext

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमी देण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजंसीला (NIA) यासंदर्भात ई-मेल मिळाला आहे. एवढेच नाही, तर या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहोत, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे. (Conspiracy To Assassinate PM Modi) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स (RDX) आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात होता. पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटासंदर्भातील ई-मेलचा स्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहेत. तसेच, या नापाक इराद्याने दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केल्याचेही, संस्थांचे म्हणणे आहे.

ईमेलनुसार, हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मेलमध्ये म्हण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनाही पाठवला आहे. 

ज्या मेल आयडीवरून हा मेल आला, त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला आला आहे.
 

Web Title: Big news PM Modi threatened to kill NIA's Mumbai branch receives threatening e-mail plan to attack with 20 kg RDX

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.