Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 13:42 IST2021-06-07T13:35:20+5:302021-06-07T13:42:39+5:30
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर ते बोलण्याची शक्यता आहे.

Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार
कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. आज लाखावर नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आजपासून अनेक राज्यांनी अनल़ॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. (Prime Minister Narendra Modi to address the nation at 5 PM today, 7th June.)
पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर ते बोलण्याची शक्यता आहे. याचसोबत ते लोकांना कोरोनामध्ये घ्यायची काळजी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून काळजी घेण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.
Prime Minister Narendra Modi to address the nation at 5 PM today, 7th June. pic.twitter.com/722gehNL6a
— ANI (@ANI) June 7, 2021
1 मे पासून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. मात्र, त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली होती. परंतू राज्यांना लस मिळत नाहीय. राज्यांनी काढलेल्या ग्लोबल टेंडरना कंपन्यांनी केराची टोपली दाखविली आहे. देशात सध्या तीन कंपन्यांच्या लस मिळत आहेत, तर आणखी काही कंपन्यांच्या लस येत्या काळात मिळणार आहेत. परंतू या कंपन्यांनी आम्ही केंद्र सरकारलाच लस देणार असल्याचे स्पष्ट केल्याने राज्यांनी केंद्र सरकारनेच या वयोगटाचे लसीकरण हाती घ्यावे अशी मागणी केली होती. आता केंद्र सरकार हे लसीकरण ताब्यात घेण्याची शक्यता आहे.