SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 11:50 AM2020-09-30T11:50:28+5:302020-09-30T11:51:12+5:30

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी अनेक नियम बदलणार आहे.

Big news for SBI-ICICI and HDFC customers; Debit-credit card rules changed | SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले

SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले

Next

कोरोना महामारीच्या काळात बँकिंग सेक्टरमध्ये मोठे बदल होऊ लागले आहेत. 30 सप्टेंबर म्हणजेच आज मध्यरात्रीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या (Debit-Credit Card) एका खास सेवेमध्ये बदल केले जाणार आहेत. ही सेवा बंद केली जाणार आहे. याचाच अर्थ उद्यापासून ही सेवा ग्राहकांना मिळणार नाही. यासाठी देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI आणि HDFC बँकांनी ग्राहकांना मेसेजही पाठविले आहेत. 


भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी अनेक नियम बदलणार आहे. ही सेवा आंतरराष्ट्रीय व्यवहाराशी जोडलेली आहे. कोरोना संकटामुळे बँकांना आरबीआयने नवे नियम लागू करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत दिली होती. या नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डवरून व्यवहार करण्यासाठी आता वेगळी प्राथमिकता सांगावी लागणार आहे. 


ICICI-SBI ने पाठविला मेसेज
ICICI बँकेने ग्राहकांना वेगवेगळे मेसेज पाठविले आहेत. या मेसेजनुसार आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार ग्राहकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ऑनलाईन ट्रान्झेक्शन बंद केले जाणार आहे. जर तुम्हाला ही सुविधा हवी असेल किंवा वापरायची असेल तेव्हा ती इनेबल म्हणजेच सुरु करून केवळ ७ दिवसांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी सुरु ठेवण्यासाठी INTL नंतर कार्ड नंबरचे शेवटचे चार आकडे टाईप करून 5676791 वर SMS करावा लागणार आहे. एसबीआयनेही ग्राहकांना असाच मेसेज पाठविला आहे. 


RBI च्या गाईडलाईन काय सांगतात? 
आंतरराष्ट्रीय फसवणुकीमुळे आरबीआयने नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार ग्राहकांना त्यांच्याकडील कार्डचा वापर कशासाठी करायचा आहे ते स्पष्ट करावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर निवडावा लागणार आहे. जेव्हा गरज असेल तेव्हाच या सुविधा वापरता येणार आहेत. मात्र, यासाठी बँकेला सांगावे लागणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्झेक्शन करताना देशांतर्गत वापराला परवानगी असणार आहे. तसेच ही सुविधा कार्डसोबतच मिळणार आहे. यासाठी बँकाच ग्राहकांचा आधीचा वापर लक्षात घेऊन त्यांना देण्याची सेवा ठरविणार आहेत. तसेच ग्राहकही बँकांना कळवून कोणती सेवा सुरु कोणती बंद करायची हे देखील सांगू शकणार आहेत. 

Web Title: Big news for SBI-ICICI and HDFC customers; Debit-credit card rules changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.