ब्रेकिंग : NCERT समितीने सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या जागी 'भारत' लिहिण्याची शिफारस केली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 02:18 PM2023-10-25T14:18:52+5:302023-10-25T14:20:07+5:30
NCERT पॅनलने सर्व NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ठिकाणी नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.
एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये नवा ऐतिहासिक बदल होणार आहे. एनसीईआरटी पॅनेलने सर्व NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ठिकाणी नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे. या बदलानंतर आता विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत हा शब्द शिकवला जाणार आहे. NCERT पॅनलने सर्व NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये भारताचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.
या पॅनेलमधील एका सदस्याने दिलेली माहिती अशी, NCERT पुस्तकांच्या पुढील संचामध्ये इंडिया हे नाव बदलून भारत केले जाईल. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता, तो आता मान्य करण्यात आला आहे. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये "हिंदू विजय" ठळक करण्याची शिफारसही केली आहे. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये 'प्राचीन इतिहास'च्या जागी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची शिफारस केली. इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही, कारण भारत हे एक जुने राष्ट्र आहे आणि ब्रिटिश साम्राज्यवादाबद्दल अनभिज्ञ आहे.
NCERT Committee recommends replacing India with 'Bharat' in all school textbooks. pic.twitter.com/prFn1s5wGZ
— ANI (@ANI) October 25, 2023