स्टार्ट अप इंडियामध्ये युवकांना मोठी संधी - नरेंद्र मोदी

By admin | Published: December 27, 2015 12:02 PM2015-12-27T12:02:21+5:302015-12-27T12:02:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी देशवासियांना नाताळ आणि आगामी नवर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Big opportunity for youth in Start up India - Narendra Modi | स्टार्ट अप इंडियामध्ये युवकांना मोठी संधी - नरेंद्र मोदी

स्टार्ट अप इंडियामध्ये युवकांना मोठी संधी - नरेंद्र मोदी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात'  कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी देशवासियांना  नाताळ आणि आगामी नवर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी स्वच्छतेच्या मुद्दावर भर दिला. 
सध्या नाताळच्या सुट्टया असल्याने देशात पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवली पाहिजे. आपण अतिथी देवो भव म्हणतो. जेव्हा पाहुणे आपल्या घरी येणार असतात तेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या पर्यटनस्थळी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवली पाहिजे. ज्यामुळे जगात भारताची प्रतिमा आणखी चांगली होईल असे मोदी म्हणाले. 
या संवाद कार्यक्रमातून त्यांनी सरकारच्या विविध योजना कशा यशस्वी, परिणामकारक ठरल्या त्याचीही माहिती दिली. मी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण करताना स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टँण्ड अप इंडिया योजनेबद्दल बोललो होतो. स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टँण्ड अप इंडिया योजनेमध्ये देशातील युवकांना मोठी संधी असून, येत्या १६ जानेवारीला आम्ही या योजनेचा अँक्शन प्लान सादर करणार आहोत. देशातील विद्यापीठे, युवक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. 
सामान्य माणूस जो बँकेमध्ये जाण्याचा विचारही करत नव्हता त्याला मुद्रा योजनेतंर्गत आज सहजतेने कर्ज उपलब्ध होत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करुन सहज माझ्याशी स्वत: जोडू शकता. तुमच्या नव्या कल्पना, विचार या अॅपच्या माध्यमातून मला सांगा असे आवाहन मोदींनी केले. 
 
'मन की बात' मधील मुद्दे
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातून नाताळ आणि आगामी नववर्षाच्या देशवासियांना दिल्या शुभेच्छा.
पर्यटनस्थळी विशेष स्वच्छता अभियान राबवण्याची गरज 
अतिथी देवो भव, पाहुणे घरी येतात तेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांवरही स्वच्छता ठेवली पाहिजे.
वीज नव्या गावात पोहोचल्याची बातमी मिळते तेव्हा आनंद, समाधान मिळते.
मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करा आणि थेट माझ्याशी संपर्क साधा.
१६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टॅंण्ड अप इंडियाचा अॅक्शन प्लान देशासमोर सादर करणार.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यंदा छत्तीसगडमध्ये युथ फेस्टीव्हलचे आयोजन, युथ फेस्टीव्हलसाठी नरेंद्र मोदी अॅपवर नव्या कल्पना सांगा.
आपण ज्यांना विकलांग म्हणतो त्यांना ईश्वराने अतिरिक्त शक्ती दिली आहे जी आपण पाहू शकत नाही, आपण तिथे विकलांगऐवजी दिव्यांग शब्द वापरु शकतो का ?
योजना लोकांसाठी असतात, त्या फायलीपर्यंत मर्यादीत रहाता कामा नयेत.
२६ जानेवारीपूर्वी कर्तव्य या विषयावर तुमचे विचार मला कळवा, या विषयावर मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत.
डीबीटीएस, थेट लाभ हस्तांतरण योजनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले, या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली.
विविध योजनांतर्गत ४० हजार कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले.
या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता, आता पुढच्यावर्षी मन की बातमधून पंतप्रधान संवाद साधणार.
 
 

Web Title: Big opportunity for youth in Start up India - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.