कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:25 AM2021-11-29T08:25:12+5:302021-11-29T08:25:20+5:30

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचा दर 85 डॉलरवर पोहोचला होता, पण गेल्या 10 दिवसांत 76-77 डॉलर प्रति बॅरलच्या किमतीवर आहे.

Big reduction in crude oil prices, petrol-diesel will be cheaper? Find out today's rates | कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर...

कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर...

Next

नवी दिल्ली: आजही(सोमवार, 29 नोव्हेंबर 2021) देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर(Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. तेलाच्या किमती स्थिर राहण्याचा हा सलग 25 वा दिवस आहे. 3 नोव्हेंबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 10 आणि 5 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर अनेक राज्यांनी व्हॅटमध्येही कपात केल्यामुळे संबंधित राज्यांमध्ये तेलाच्या किमती आणखी खाली आल्या. मात्र, असे असतानाही बहुतांश मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे.

कच्चा तेलाचे दर घसरले

पेट्रोल-डिझिलचे दर स्थिर असले तरी कच्च्या तेलाच्या किंमतीत(Brent Crude Price) गेल्या दोन आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचा दर 85 डॉलरवर पोहोचला होता, पण गेल्या 10 दिवसांत त्यात लक्षणीय घट झाली आहे. आता ते 76-77 डॉलर प्रति बॅरलच्या किमतीवर आहे. अखेरच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स 5.50 टक्क्यांनी घसरून $77.70 प्रति बॅरल होते. तर, देशांतर्गत व्यवहारात कच्च्या तेलाची किंमत 297 रुपयांनी घसरुन 5,540 रुपये प्रति बॅरलवर आली आहे.

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घट कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होऊ शकते. देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरत राहिल्यास देशात इंधनाचे दर कमी होतील. देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करतात. परंतु, गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आलेली नाही. येत्या काळात कच्चा तेलाचे दर आणखी कमी झाल्यास, भारतातही इंधनाचे दर कमी होऊ शकतात.

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे दर

  • मुंबई: पेट्रोल - ₹109.98 प्रति लिटर; डिझेल - ₹ 94.14 प्रति लिटर
  • दिल्ली: पेट्रोल - ₹103.97 प्रति लिटर; डिझेल - ₹86.67 प्रति लिटर
  • कोलकाता: पेट्रोल - ₹104.67 प्रति लिटर; डिझेल - ₹ 89.79 प्रति लिटर
  • चेन्नई: पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर; डिझेल - ₹91.43 प्रति लिटर
  • नोएडा: पेट्रोल - ₹95.51 प्रति लिटर; डिझेल - ₹ 87.01 प्रति लिटर
  • भोपाळ : पेट्रोल - ₹107.23 प्रति लिटर; डिझेल - ₹90.87 प्रति लिटर
  • बंगळुरू: पेट्रोल - ₹100.58 प्रति लिटर; डिझेल - ₹ 85.01 प्रति लिटर
  • लखनऊ: पेट्रोल - 95.28 रुपये प्रति लिटर, डिझेल - 86.80 रुपये प्रति लिटर
  • चंदीगड: पेट्रोल - ₹94.23 प्रति लिटर; डिझेल - 80.90 रुपये प्रति लिटर

Web Title: Big reduction in crude oil prices, petrol-diesel will be cheaper? Find out today's rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.