SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 17:58 IST2020-05-07T17:57:44+5:302020-05-07T17:58:43+5:30
बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने ६ मे रोजी व्याज दरामध्ये कपात केली होती.

SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेंट बँकेने एमसीएलआर आधारित कर्जांच्या व्याजदरात १५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. ही कपात सर्व मुदतीच्या कर्जावर करण्यात आली आहे. यामुळे एका वर्षाच्या कर्जावरील व्याजदर ७.४० वरून ७.२५ टक्के झाला आहे. हे नवीन दर १० मे पासून लागू होणार आहेत. बँकेने सांगितले की, सलग १२ वेळा व्याजदरामध्ये कपात करण्यात आली आहे.
याचबरोबर स्टेट बँकेने टर्म डिपॉजिटला मोठा धक्का दिला आहे. मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून २० बेसिस पॉईंटनी ही कपात केली जाणाक आहे. ही कपात १२ मे पासून लागू होणार असून तीन वर्षांच्या अवधीसाठी ही कपात असणार आहे.
वरिष्ठ नागरिकांना बोनस
स्टेट बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी एसबीआय वुई केअर डिपॉझिट स्कीम सुरु केली आहे. यानुसार ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अवधीच्या ठेवींवर ३० बेसिस पॉईंट एवढा जादा व्याजदर मिळणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रनेही कपात केली
बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने ६ मे रोजी व्याज दरामध्ये कपात केली होती. दोन्ही बँकांनी व्याजदरामध्ये १० बेसिस पॉइंटची कपातीची घोषणा केली. यानुसार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एक वर्षाच्या कर्जासाठी ८.१५ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रचा व्याजदर ७.९० टक्के राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात
कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले