मोठं घबाड सापडलं! कानपूरमध्ये आयकरचा छापा; गुटखा व्यावसायिकाच्या घरात कुलूप तोडून प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:29 IST2025-02-13T08:56:33+5:302025-02-13T09:29:35+5:30

कानपूरमधील पान मसाला व्यावसायिकाच्या घरावर, गोदामावर आणि भावाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला.

Big scam found! Income Tax raid in Kanpur; Gutkha businessman's house broken open and entered | मोठं घबाड सापडलं! कानपूरमध्ये आयकरचा छापा; गुटखा व्यावसायिकाच्या घरात कुलूप तोडून प्रवेश

मोठं घबाड सापडलं! कानपूरमध्ये आयकरचा छापा; गुटखा व्यावसायिकाच्या घरात कुलूप तोडून प्रवेश

उत्तर प्रदेशमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. कानपूरमधील पान मसाला व्यापाऱ्यावर छापा टाकण्यासोबतच आयकर विभागाने पान मसाला व्यापाऱ्याच्या घरावर, गोदामावर आणि त्यांच्या भावाच्या घरावरही छापा टाकला आहे. या छाप्यामुळे शहरात दिवसभर गोंधळ उडाला. आयकर अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे व्यावसायिकांची प्रकृती बिघडली. 

रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू ठेवली. स्थानिक अधिकाऱ्यांनी या कारवाईबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 

सकाळी ६ वाजताच्या सुमारास लखनौ आणि दिल्ली येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने राजेंद्र नगर येथील पान मसाला व्यापारी अमित भारद्वाज यांच्या घरावर छापा टाकला. जेव्हा अधिकारी घराबाहेरील गेटवर पोहोचले तेव्हा त्यांनी अनेक वेळा बेल वाजवली, पण व्यावसायिकाने दरवाजा उघडला नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी गेटचे कुलूप तोडले.

मिळालेली माहिती अशी, याबाबत अधिकाऱ्यांना तक्रार मिळाली होती. व्यावसायिकाने एकाच वाहनाच्या बिलाचा वापर करून अनेक वाहनांचे सामान कानपूरच्या एका कंपनीला पाठवले होते, अशी माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर दुपारी १२.३० वाजता काही अंतरावर त्रिवतीनाथ मंदिराजवळील बीडीए कॉलनीतील त्याचा मोठा भाऊ रामसेवक यांच्या घरी घेऊन गेले. येथे पोहोचल्यावर कळले की ते महाकुंभमेळ्याला गेले आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाच्या घराचे आणि घरासमोरील गोदामाचे कुलूप तोडून टाकले.

पथकांनी संध्याकाळपर्यंत व्यावसायिक आणि त्यांच्या भावाच्या घराची झडती घेतली. यावेळी करचोरी आणि बेकायदेशीर स्रोतांची माहिती गोळा केली. यावेळी, आयकर पथकाने कुटुंबातील सदस्य आणि घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून माहिती गोळा केली.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत, व्यावसायिकाच्या घरावर आणि गोदामावर छापा सुरू होता. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. पण दोन्ही घरांबाहेर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवेश पूर्णपणे बंदी घातली होती. अधिकाऱ्यांनी नातेवाईकांचे आणि व्यावसायिकांचे फोन जप्त केले. 

Web Title: Big scam found! Income Tax raid in Kanpur; Gutkha businessman's house broken open and entered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.