बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 00:07 IST2025-04-09T00:06:41+5:302025-04-09T00:07:14+5:30
Baba Siddique Case: पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपांनी पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी बाबा सिद्दिकी प्रकरणात मोस्ट वॉन्टेड होता.

बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!
Baba Siddique Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात सामील असलेला एक मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला असून, पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरी झालेल्या स्फोट प्रकरणातही या आरोपीचा सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. पंजाबपोलिसांनी त्याला अटक केली आहे. झिशान अख्तरच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. जालंदर येथे भाजपा नेते मनोरंजन कालिया यांच्या घरी स्फोट करण्याचा प्रयत्न असलेल्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे झिशान अख्तरच्या गँगमधील आहेत. यातील झिशान अख्तर हा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सामील आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर झिशान सिद्दीकी फरार झाला होता. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी जे फरार आरोपी आहेत, त्यामध्ये शुभम लोणकर याचाही समावेश आहे.
झिशान अख्तर याच्या सांगण्यावरुनच बाबा सिद्दिकी यांची हत्या
झिशान अख्तर याच्या सांगण्यावरुनच बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली, असे बोलले जात आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघे सूचना देत होते, हे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या झिशान अख्तरच्या मागावर मुंबई पोलीस होते. आता त्याला पंजाबच्या जालंधरमध्ये अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या झिशान अख्तरला पंजाब येथील जालंधर पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी याबद्दलची खात्री केलेली आहे की, झिशान अख्तर हा तोच आरोपी आहे, जो बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी आरोपी होता.
दरम्यान, मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेर वाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बहराइच, उत्तर प्रदेश येथील रहिवासी हरीश कुमार, कैथल, हरयाणा येथील गुरमेल बलजित सिंग, बहराइच, उत्तर प्रदेश येथील धर्मराज कश्यप आणि पुण्यातील रहिवासी प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे.