बिगफाईट

By admin | Published: October 7, 2014 05:20 AM2014-10-07T05:20:33+5:302014-10-07T05:20:33+5:30

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीत यावेळी उत्कंठापूर्ण लढत होणार आहे.

BigFight | बिगफाईट

बिगफाईट

Next

अमरावतीचा गड नेमका राखणार कोण?

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीत यावेळी उत्कंठापूर्ण लढत होणार आहे.
रावसाहेब शेखावत हे हल्ली काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसचे माजी अर्थराज्यमंत्री सुनील देशमुख यांचे तिकीट कापून रावसाहेबांना २००९ च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. 'तुम्ही शांत रहा. सरकार आल्यास तुम्हाला थेट मंत्रिपद देण्यात येईल,' ही पक्षश्रेष्ठींची आॅफर सुनील देशमुखांनी स्वाभिमानाच्या लढाईसाठी धुडकावली होती. काँग्रेसविरुद्ध त्यांनी बंडखोरी केली होती. आता त्यांनी भाजपाच्या तिकिटावर मैदानात उडी घेतली आहे. पुन्हा एकदा रावसाहेब शोखावत आणि सुनील देशमुख आमनेसामने उभे ठाकले आहेत. या मतदारसंघात मुस्लिमांची मते सर्वाधिक आहेत. ऐंशी हजारांच्या घरातील या निर्णायक मतांची जाणीव असतानाही देशमुखांनी राष्ट्रवादीचा पर्याय नाकारून भाजपा निवडण्यामागे निश्चितच ठोस गुपित दडले आहे. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरणारी ही मते रावसाहेबांसाठी जमेची बाजू आहे. यावेळी बसपाने मुस्लीम उमेदवार उभा केल्यामुळे मतविभाजन होईल. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात, विकासाच्या मुद्यावरून वातावरण तापेल. अवघ्या दोन दुचाकींवर प्रवास करून प्रचार करणारे प्रदीप बाजड हे शिवसेनेतर्फे आणि चेहराच नसल्यामुळे तिकिटाची लॉटरी लागलेले गणेश खारकर हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत.

देवळीत कांबळे-मेघे यांच्यात अप्रत्यक्ष लढत


काँग्रेसचे हेवीवेट मंत्री रणजित कांबळे हे देवळी मतदारसंघातून चवथ्यांना निवडणुकीला सामोरे जात आहेत. भाजपाने यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्यावर बाजी लावली असून त्यांना माजी खासदार दत्ता मेघे यांचे पाठबळ असणार आहेत. या निमित्ताने जुने राजकीय शत्रू कांबळे आणि मेघे अप्रत्यक्ष आमने-सामने असतील.
गत निवडणुकीत या मतदारसंघात रणजित कांबळे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात काट्याची लढत झाली होती. अल्पमतांनी का होईना कांबळे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली होती. तडस आता लोकसभेत गेल्यामुळे भाजपाने सुरेश वाघमारे यांना रिंंगणात उतरविले आहेत. काँग्रेसमध्ये रणजित कांबळे आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्यातील टोकाचे राजकीय मतभेद सर्वश्रूत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मेघे यांनी भाजपात प्रवेश केला. मेघे यांनी बहुमत नसतानाही जि.प.वर भाजपाचा झेंडा फडकावत काँग्रेसला नव्हे, कांबळे यांना पहिला झटका दिला. देवळी मतदारसंघावर त्यांची वक्रदृष्टी आहे.
स्थानिकांना डावलून बाहेरचा उमेदवार दिला, असा नाराजीचा सूर भाजपातही आहे. यामुळे वाघमारे यांना कितीही भक्कम पाठबळ असले तरी ते कितपत तग धरू शकते, ही बाब भाजपाश्रेष्ठींची चिंता वाढविणारी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पहिल्यांदाच निवडणूक रिंंगणात आहे. या दोन्ही पक्षांची भूक किती मतांची आहे, बसपाची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडते, याबाबीही निर्णायक ठरतील.

Web Title: BigFight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.