४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

By admin | Published: October 31, 2016 07:15 AM2016-10-31T07:15:29+5:302016-10-31T07:15:29+5:30

ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले

The biggest loss in 40 years | ४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

Next


रायपूर : ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले जाणे ही आपल्या संघटनेच्या ४० वर्षांच्या ‘क्रांतीकारी लढ्या’तील सर्वात मोठी हानी असल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने दिली असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘बंद’ची हाक दिली आहे.
स्वत:ला संघटनेचा मध्य क्षेत्राचा अधिकृत प्रवक्ता म्हणविणाऱ्या प्रताप नावाच्या व्यक्तीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, २४ आॅक्टोबरच्या सकाळी ओडिशात आमचे २७ सदस्य मारले गेले. गेली ४० वर्षे पक्षाने हाती घेतलेल्या क्रांतिकारी संघर्षातील ही सर्वात मोठी हानी होती. पक्षाचे आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ व तेलंगणमधील अनेक ज्येष्ठ नेते व सदस्य त्या कारवाईत मारले गेले. आमच्या सदस्यांना सरकारने कपटाने मारले व त्यासाठी शरण आलेल्या माओवाद्यांती मदत घेण्याचा दुनाच हातखंडा वापरला गेला.
परंतु सरकारच्या अशा कपटी कारस्थानांनी पक्ष दुबळा न होता आमचा लढा यापुढेही सुरुच राहील, अशी वल्गना करताना या प्रसिद्धी पत्रकात असा आरोप केला गेला की, पोलिसांनी आमच्या ११ जखमी सदस्यांना पकडले व नंतर छळ करून त्यांना ठार केले. मोदी सरकार आणि राज्यांची सरकारे आदिवासी भागांमध्ये आक्रमकतेने खाणकामे हाती घेत आहे. पण अशा पिळवणुकीने लोकांमधील असंतोष वाढीला लागतो, याचा शासकांना विसर पडला असून याची त्यांना मोठी किंमत मोडावी लागेल, अशी धमकीही या पत्रकात देण्यात आली. (वृत्तसंस्था)
>म्हणे, दडपशाही वाढली
याआधीही अनेक वेळा असे मोठे आघात होऊनही आणि हजारो सदस्य गमावूनही आमच्या क्रांतिकारी लढ्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे, असा दावा करून पत्रक म्हणते की, आदिवासींच्या पिळवणुकीच्या विरोधात आमची संघटना नेहमीच उभी राहिली आहे. पण ‘आॅपरेशन ग्रीन हंट’चा तिसरा टप्पा हाती घेऊन केंद्र व राज्य सरकारे आमचा लढा चिरडून टाकू पाहात आहेत. (केंद्रीय गृहमंत्री) राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम व कोरापूटला भेट दिल्यानंतर सरकारी दडपशाही वाढली आहे.

Web Title: The biggest loss in 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.