देशातील सर्वांत मोठा बोगदा सुरू होणार
By Admin | Published: March 20, 2017 12:40 AM2017-03-20T00:40:58+5:302017-03-20T00:40:58+5:30
भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी
जम्मू : भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
काश्मीरवासीयांसाठी हा आशेचा बोगदा असल्याचे संबोधले गेले असून, या बोगदा खुला झाल्यानंतर जम्मू ते काश्मीर या मार्गातील ३८ किमीचा खडतर मार्ग कोणत्याही मोसमात खुला राहणार आहे. विशेष म्हणजे या बोगद्याचे भूमिपूजन २०११ साली राहुल गांधी यांच्या हस्ते झाले होते. (वृत्तसंस्था)
समस्या मिटणार
बर्फवृष्टी आणि हिमस्खलनामुळे वारंवार ठप्प होणा-या राष्ट्रीय महामार्ग एकची या बोगद्यामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. अडतीस किमीचा फेरा वाचणार आहे. बोगद्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क आणि मनोरंजनासाठी एफएम सिग्नलही मिळावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.गद्यामुळे जम्मूहून काश्मीर अडीच तासांत गाठता येणार.
मार्च आणि 15 मार्चला पहिले ट्रायल घेण्यात आले आहे.सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक 75 मीटरवर एक असे 124 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी एक सेंट्रलाइज्ड रूमदेखील तयार करण्यात आली आहे.