2017 मध्ये आहेत सर्वात मोठे विकेंड
By admin | Published: January 17, 2017 01:55 PM2017-01-17T13:55:46+5:302017-01-17T16:20:41+5:30
२०१७ मध्ये मोठे विकेंड आल्याममुळे नागरिकांची चंगळ त्यांना सुट्टीचा आनंद दिलखुलासपणे उपभोगता येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - या वर्षांत सुट्ट्यांची चंगळ असून 2017 मध्ये तब्बल 24 सुट्ट्या आल्या आहेत. विशेष म्हणजे ब-याच सुट्ट्या या वीकेंडला लागून आल्यामुळे अनेकांना बाहेर फिरता येणार आहे. चालू वर्षात ब-याच सुट्ट्या या शुक्रवारी आल्या आहेत त्यामुळे अनेकांना तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
2017 या चालू वर्षात आठवड्यांच्या शेवटी अथवा सुरवातीला शासकीय सुट्टया आल्या आहेत. 2016 मध्ये महात्मा गांधी जयंती, दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी रविवारी आल्याने अनेकांची निराशा झाली होती. पण 2017 मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आलेल्या सुट्टया ह्या आठवड्याखेरीस असल्यामुळे तुम्हाला सुट्टीचा आनंद घेता येईल. शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी पकडली तर 17 दिवसांच्या सुट्टीचा आनंद अनेकांना घेता येणार आहे. याशिवाय, वर्षातले पाच सण हे सोमवारी आले आहेत.
उदा. 2017 जानेवारीमध्ये 26 तारखेला प्रजास्ताक दिनाची सुट्टी असून तो गुरुवारी आला आहे. त्यामुळे तुम्ही शुक्रवारची सुट्टी टाकली तर गुरूवार ते रविवार अशी सलग 4 दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही मजा करू शकाल
असे करा तुमच्या विकेंडचे नियोजन....
24 फेब्रुवारी- शुक्रवार- महाशिवरात्री
13 मार्च - सोमवार- होळी धूलिवंदन
28 मार्च- मंगळवार- गुढीपाडवा (सोमवारी सुट्टी घ्या)
4 एप्रिल- मंगळवार- रामनवमी (सोमवारी सुट्टी घ्या)
14 एप्रिल- शुक्रवार- डॉ. आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे
1 मे- सोमवार- महाराष्ट्र दिन
26 जून - सोमवार- रमजान ईद
15 ऑगस्ट- मंगळवार- स्वातंत्र्य दिन (सोमवारी सुट्टी घ्या)
17 ऑगस्ट - गुरुवार- पारसी न्यू इअर (शुक्रवारी सुट्टी घ्या)
25 ऑगस्ट- शुक्रवार- गणेश चतुर्थी
2 ऑक्टोबर- सोमवार- महात्मा गांधी जयंती
19 ऑक्टोबर- गुरूवार - दीपावली-लक्ष्मीपूजन (शुक्रवारी सुट्टी घ्या)
20 ऑक्टोबर- शुक्रवार झ्र बलिप्रतिपदा
25 डिसेंबर- सोमवार- नाताळ