बिहार - छटपूजेहून परतताना ट्रेनची धडक, 6 महिलांचा मृत्यू
By admin | Published: November 7, 2016 08:55 AM2016-11-07T08:55:04+5:302016-11-07T11:18:08+5:30
बिहारमधील दरभंगा येथे छटपूजा साजरी करु परतणा-या भाविकांचा अपघात झाला आहे. रामभद्रपूर स्टेशनजवळ रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनने धडक दिल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 7 - बिहारमधील दरभंगा येथे छटपूजा साजरी करु परतणा-या महिला भाविकांचा अपघात झाला आहे. रामभद्रपूर स्टेशनजवळ रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनने धडक दिल्याने सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामुळे छठ पर्वाच्या समारोप उत्सवावर शोककळा पसरली आहे. तर दुस-या घटनेत मुझफ्फरपूर येथे पाच मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
छठ पूजा करुन या महिला परतत होत्या. मात्र रामभद्रपूर स्टेशनजवळ 'स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस'ने धडक दिल्याने सहा जणींचा जागीच मृत्यू झाला. 'स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस' समस्तीपूरहून दरभंगाला चालली होती. धुकं असल्याने महिलांना ट्रेन येताना दिसली नसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी करत निदर्शन केलं. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.
Darbhanga (Bihar): 6 women dead after being hit by a train near Rambhadrapur station when they were returning from Chhath Puja celebrations
— ANI (@ANI_news) November 7, 2016