स्वत:च्याच घरात 30 वर्षांपासून कैद आहे 'ही' व्यक्ती, कारण वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 09:01 AM2022-06-03T09:01:36+5:302022-06-03T09:02:02+5:30
bihar : पीडित व्यक्तीच्या 90 वर्षीय आईकडून याबाबतची हकीकत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
पटणा : गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी कैदी कारागृहात राहतात, मात्र बिहारमध्ये एक व्यक्ती 30 वर्षांपासून आपल्याच घरात कैद आहे. ही व्यक्ती बंदिवासात नियमित कामे करते आणि आपल्या फावल्या वेळेत बारच्या बाहेर डोकावत राहते. हे प्रकरण बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील आहे. पीडित व्यक्तीच्या 90 वर्षीय आईकडून याबाबतची हकीकत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही रुपयांच्या उपचारापासून वंचित होऊन 30 वर्षे स्वत:च्या घरात कैद्याप्रमाणे राहू शकतो, यावर विश्वास बसणे कठीण आहे.
केंद्र सरकारसह राज्य सरकार आरोग्य सुविधांवर कोट्यवधींचा खर्च करते. प्रत्येक सामान्य माणसाला मोफत उपचार देण्याचा दावा केला जातो. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी अनेक योजना सुरू आहेत, पण वास्तव काय आहे. भागलपूर शहरात एक व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून स्वत:च्या घरात कैद आहे. दरम्यान, ही व्यक्ती सिझोफ्रेनिया (Schizophrenia) म्हणजेच मानसिक आजाराने ग्रस्त आहे. यावर उपचार करणे संभव आहे. अनेक सरकारी डॉक्टरांव्यतिरिक्त बिहारमध्ये अशा रुग्णांवर उपचार करणारे खाजगी दवाखाने आहेत, परंतु या सुविधा पीडित व्यक्तीच्या आईपर्यंत पोहोचत नाहीत.
अली हसन असे स्वत:च्या घरात कैद झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मानसिक आजारी आहे. अली हसन यांनी कुठेही बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या आईने त्यांना घरात लॉकअप रूम बनवली आहे. त्यातच अली हसन यांना बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवले. आई वृद्ध आहे. जेवण बंद घरातच दिले जाते. मुलगा तीस वर्षांपासून आत बसला आहे. तो दिसायला निरोगी आहे, केवळ उपचाराअभावी त्याला बंदिवासात जगावे लागत आहे.
वृद्ध आई हुस्ना आरा यांनी सांगितले की, आपल्या मुलाची अवस्था पाहून मी रडत राहते. त्याची अवस्था पाहावली जात नाही. बाहेर आल्यावर तो मारहाण करतो, गोंधळ घालतो. भीतीमुळे घरात कैद केले आहे. याचबरोबर,सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि अली हसनवर उपचार झाले पाहिजेत, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, अली हसनवर उपचार करता यावेत यासाठी शेजारी मीडियाच्या माध्यमातून सोनू सूदपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.